राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय येथे विज्ञान दिन साजरा विद्यार्थिनींनी संशोधक होण्यासाठी प्रयत्न करा. डॉ मिरा बारई

राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय येथे विज्ञान दिन साजरा

विद्यार्थिनींनी संशोधक होण्यासाठी प्रयत्न करा. डॉ मिरा बारई

राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय येथे विज्ञान दिन साजरा विद्यार्थिनींनी संशोधक होण्यासाठी प्रयत्न करा. डॉ मिरा बारई

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, लाखनी येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डॉ सौ मिरा बारई व प्रमुख वक्ते म्हणून सौ निधी खेडीकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी सौ निधी खेडीकर यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व आणि रमण इफेक्ट याबाबद मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका डॉ मिरा बारई यांनी शास्त्रज्ञांच्या कार्याची शिकवण घेऊन सदैव पुढे चालत राहण्याचा प्रयत्न विद्यार्थिनींनी केला पाहिजे तसेच संशोधकवृत्ती ओळखून संशोधक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्या कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या. विज्ञान दिना निमित्त विद्यालयात प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रयोग स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रतिकृती आणि पोस्टर स्पर्धेत 22 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थिनीचे सत्कार करण्यात आले. यावेळी विद्यालयातील श्री निनावे, विज्ञान शिक्षिका खंडाईत, सौ चव्हाण, गायधनी, प्रीती पाटील, लाडे, सौ निधी खेडीकर आदी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु साक्षी टिचकुले व आभार फाल्गुनी हजारे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here