!! मानवता विकास संस्था भारत ( नेफडो ) च्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलन सोहळ्यात मा. श्री.यशवंत उपरीकर यांचा सत्कार समारंभ २७ फेब्रुवारी २०२२ ला संपन्न !!

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

पुणे :- दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोज रविवारला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत ( नेफडो ) च्या वतीने राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे येथे दि. २७ /२ /२०२२ ला करण्यात आले होते. नैसर्गिक पर्यावरण, संवर्धन, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मुलन व मानवता विकासावर चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त मा. यशवंत उपरीकर सर साकोली यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
त्यावेळी सिनेमा अभिनेते जयराज नायर, वनविभागाचे मुख्य वन संरक्षक मा. रंगनाथ नैकडे, नेफडोचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुयोग धस सर, नेफडो चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. दिपक भवर, नेफडो चे राष्ट्रीय सचिव मा. सचिन वाघ सर, व इतर मान्यवरांचे हस्ते सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. आणि मा.यशवंत उपरिकर सर यांचा मनोबल वाढवून सत्कार समारंभ सोहळा पार पाडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here