राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व्दारा महाराष्ट्रातील आदिवासींवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

*राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व्दारा महाराष्ट्रातील आदिवासींवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व्दारा महाराष्ट्रातील आदिवासींवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602

आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 ला महाराष्ट्र राज्याच्या 358 तहसीलवर एकाच दिवशी आदिवासींवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राज्यव्यापी चरणबद्ध धरणे आंदोलनाचा एक भाग म्हणून पाचोरा तालुक्या मध्ये सुद्धा एक दिवसीय धरणे प्रदर्शन आणि निवेदन देण्यात आले. *आंदोलनाच्या प्रमुख मुद्द्यात*
१)महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट क्षेत्रात व्याघ्र प्रकल्प आणि अन्य प्रकल्पाच्या नावावर आदिवासींचे होणारे विस्थापन.
२) आदिवासी लोकांना दहा लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन जल, जंगल आणि जमीन व ५ आणि ६ अनुसूची या अधिकारातून बेदखल करण्यात येत आहे.
३) मेळघाट प्रकल्पाच्या आजूबाजूस राहणाऱ्या आदिवासींना त्यांचे गुरेढोरे घरगुती इंधन यांच्यावर प्रतिबंध लावण्यात आलेला आहे.
४) ह्या प्रकल्पातील 2005 पूर्वीचे अतिक्रमण आणि प्रमुख प्रलंबित असलेले दावे आज पर्यंत मंजूर करण्यात आलेले नाही.
५) मेळघाट प्रकल्पातील विस्थापित झालेले बारूखेडा,सोमठाणा, नागरतास, अमोना, धारगड, गुल्लरघाट, केलपानी आणि अन्य आदिवासींच्या गावांचे पुनर्वसन आतापर्यंत केलेले नाही त्यामुळे 370 च्यावर आदिवासींची मौत झालेली आहे आणि त्यांच्या परिवाराला आतापर्यंत मुआवजा सुद्धा देण्यात आलेला नाही.
६) प्रकल्पातील पात्र लाभार्थी जसे 18 वर्षाखालील मुलगा, मुलगी, विधवा आणि बुजुर्ग यांना सुद्धा दहा लाख रुपयांच्या पॅकेज पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.
७) फर्जी आणि खोटे आरोप लावून आदिवासींना वन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून शोषण करण्यात येत आहे.
वरील मुद्द्याला धरून बहुजन क्रांती मोर्चा आणि त्यांच्या सगळ्या विंग्स यामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गफुर तडवी , राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद पाचोरा तालुका अध्यक्ष जलाल तडवी , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद सचीव मुस्तफा तडवी , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद पाचोरा तालुका सचिव जाकीर तडवी ,राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे (राज्य उपाध्यक्ष) सुनील दादा शिंदे पाचोरा ,बबलु दादा आदिवाल (अत्यंत पिछडा जाती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष) ,बहुजन क्रांती मोर्चा तथा सोशल मीडिया प्रभारी पाचोरा तालुका नंदलाल आगारे सर, ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय सचिव भिमराव दादा खैरे , विलास पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते अॅड.रंजित तडवी , अँड.रोहीत ब्राम्हणे (RD) , सरवर तडवी, कलीम तडवी (ग्रामपंचायत सदस्य कवली तालुका सोयगाव), शरीफ तडवी , सामाजिक कार्यकर्ते रोहिदास भिल्ल पिंपळगाव हरेश्र्वर , निलेश पाटील पत्रकार ,प्रविण तडवी, पिरखा तडवी ,आलेरखा तडवी, अफजल तडवी , इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here