हा माझा सत्कार नसून आपल्या आपलेपणाचा आहे-सत्कारमूर्ती मा.धनराज आवारी यांचे भावोद्गार

हा माझा सत्कार नसून आपल्या आपलेपणाचा आहे-सत्कारमूर्ती मा.धनराज आवारी यांचे भावोद्गार

हा माझा सत्कार नसून आपल्या आपलेपणाचा आहे-सत्कारमूर्ती मा.धनराज आवारी यांचे भावोद्गार

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:- नुकतेच दि.26फेब्रुवारी 2022ला खैरे कुणबी समाज सभागृह गोंडपिपरी येथे माजी गटशिक्षणाधिकारी गोंडपिपरी तथा विद्यमान शिक्षण विस्तार अधिकारी बीट ताडाळी मा.धनराज आवारी यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला होता.
यावेळेस स्वागताध्यक्ष म्हणून मा.श्री.के.डी.मेश्राम तहसिलदार गोंडपिपरी हे उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानावर मा.श्री.समाधानजी भसारकर गटशिक्षणाधिकारी पं.स.गोंडपिपरी हे विराजमान होते.सत्कारमूर्ती म्हणून मा.श्री.धनराज आवारी व त्यांच्या सौ.आवारी मँडम उपस्थित होत्या..विशेष अतिथी म्हणून मा.नामदेव राऊत विस्तार अधिकारी बीट भंगाराम तळोधी हे उपस्थित होते.
प्रथमतः पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे रितसर पुजन करुन मालार्पण करण्यात आले.
या सोहळ्याचे प्रास्ताविक मा.तेलकापल्लीवार केंद्रप्रमुख केंद्र धाबा यांनी पार पाडले.
मा.स्वागताध्यक्ष के.डी.मेश्राम तहसिलदार गोंडपिपरी यांचे हस्ते सत्कारमूर्ती मा.धनराज आवारी सर व त्यांच्या सौभाग्यवतींचे शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी या सत्कारानिमित्य तालुकास्तरावरील संघटनांच्या पदाधिकारी यांनी आपापले मत मांडले .यात असा गटशिक्षणाधिकारी आपल्या पंचायत समितीला पुन्हा लाभणार नाही.त्यांच्या कर्तृत्वाला हा शिक्षक परिवार आता मुकला आहे अशा मनाल्या भिडणा-या भावना व्यक्त केल्यात.
याप्रसंगी मा.तहसिलदार यांनी आपल्या मनोगतातून एखाद्या अधिका-याबाबत जेव्हा शिक्षक सत्कार आयोजित करतात तेव्हा तो अधिकारी खरोखरच कार्यकुशल असतो.त्याच्या कार्यातून संपूर्ण पं.स चा विकास होतो.समस्या मार्गी लागतात अन जेव्हा असे अधिकारी बदलीने आपल्याला सोडून जातात तेव्हा खरंच मन खिन्न होतेय पण बदली हा प्रशासकीय भाग असल्याने ते होणारच.पण मा.आवारी साहेब जिथे जातील तिथे आपल्या कार्याचा ठसा नक्कीच उमटवतील यात शंकाच नाही असे मत व्यक्त केले.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना मा.धनराज आवारी यांनी सांगितले की,मी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करतांना मला अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणींना शिक्षकांच्या सहकार्यानेच दूर करण्याचा प्रयत्न केला.कधीही मोठेपणा अंगी आणला नाही.आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आपल्या आपुलकीच्या माध्यमातून माझा हा भावविभोर सत्कार होतोय असे भावोद्गार त्यांनी मांडले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मा.समाधान भसारकर गटशिक्षणाधिकारी पं.स गोंडपिपरी यांनी सत्कारमूर्तीविषयी अनेक गौरवोद्गार काढले.
या सोहळ्याचे सुरेख संचालन श्री.विजय गजभे साधनव्यक्ती यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन…..यांनी पार पाडले.
कार्यक्रमानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाच्या सुरेख आयोजनासाठी सर्व विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख ,तालुक्यातील सर्व जि.प.शिक्षकवर्ग,साधनव्यक्ती यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here