बल्लारशाह पिटलाईनचे काम लवकरच पूर्णत्वास माजी केन्द्रीय मंत्री हंसराज अहिर यांची भेट

54

बल्लारशाह पिटलाईनचे काम लवकरच पूर्णत्वास
माजी केन्द्रीय मंत्री हंसराज अहिर यांची भेट

बल्लारशाह पिटलाईनचे काम लवकरच पूर्णत्वास माजी केन्द्रीय मंत्री हंसराज अहिर यांची भेट

हनिशा दुधे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

बल्लारपुर: – बल्लाशाह परिसरातील रेलवे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रयत्नाने बल्लारशाह रेलवे स्थानकात रेल्वे पिटलाईनचे काम पूर्ण होत आहे. या पिट लाईन कामाच्या पाहणीसाठी त्यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन यावेळी कामाच्या प्रगतिबाबत पाहणी करून काम तातडीने पूर्ण व्हावे अशा सूचना केल्या. यावेळी बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे अधिकारी यांनी कामाच्या प्रगतिबाबत माहिती देते काम तातडीने पूर्ण होईल या बाबत आश्वस्त केले.
बल्लारशाह येथील पिटलाईनचे भविष्यात लवकरच लोकार्पण झाल्यास या परिसरातील रेलवे प्रवाशांना अनेक नवीन गाडया आणि गाडयाचे विस्तार मिळून फार मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी हंसराज अहिर यांनी सांगितले.
या संदर्भातील माजी गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले की, जिले की रेल्वेच्या समस्यांचे संदर्भात रेल्वे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क आहेत. रेल्वे प्रवासी समस्यांना मार्गी लावण्याच्या प्रयत्न करत आहेत. बल्लारशाह रेलवे स्टेशनवर पिटलाईन निरीक्षणाच्या वेळी अहीर सोबत महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री , जेडआरयूसीसी श्रीनिवास सूंचूवार , डीआरयूसीसी सदस्य विकास राजुकर,प्रशांतभोरे,शाम सारदा,अनीश दीक्षित,प्रल्हाद शर्मा ,प्रमोद त्रिवेदी, प्रदीप माहेश्वरी,गौतम यादव,पूनम तिवारी ,देवा वाटकर, रामेश्वर पासवान ,साथ में रेलवे अधिकारी एयू खान स्टेशन अधिक्षक, जे जे राजूकर रेलवे अधिकारी आरपीएफ मिश्रा जी आदि उपस्थित होते.