शेती हि विषमुक्त व्हावी यासाठी शेतकरी व शहरातील नागरिकांसाठी निशुल्क सेंद्रिय खत निर्मिती शिबीराचे आयोजन
✒️ करण विटाळे✒️
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078
हिंगणघाट : शहरासह तालुक्यातील गावखेड्यात पशु-पक्षी संवर्धन तथा निसर्ग संवर्धनास्तव कार्यरत निसर्गसाथी फाउंडेशनच्या वतीने शहरातील झाडांचा पालापाचोळा व इतर कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण शिबिर दि. १ मार्च मंगळावर रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रशिक्षण कृषी विभागाचे अधिकारी निसर्गसाथी श्री मनोज गायधने सर , व निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष मा श्री . प्रविण कडू सर देणार आहे.
गाव – शहरातील पालापाचोळा, कचरा यांपासून होणारे वाढते प्रदुषण लक्षात घेऊन यावर मात करण्यासाठी व रासायनिक खते टाळून शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करावा व .शेती हि विषमुक्त व्हावी . यासाठी शेतकरी व शहरातील नागरिकांसाठी निशुल्क सेंद्रिय खत निर्मिती शिबीराचे आयोजन केले आहे.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. प्रविण कडू सर प्रा. डॉ बालाजी राजूरकर, प्रभाकर कोळसे, गुणवंत ठाकरे, राकेश झाडे, प्रा. सुलभा कडू, करण विटाळे, चैतन्य वावधने, चेतन विटाळे आदींनी केले आहे.
https://www.instagram.com/p/CZZH3XHl0kw/
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.