घोडाझरी कुलाबा गेटची नव्याने दुरूस्ती न केल्यास निवडणूकीवर बहिष्कार व आमरण उपोषण करण्याचा सोनापूर गाववासियांचा निर्धार

शालेय विद्यार्थी व नागरिकांना जिर्णाअवस्थेत झालेल्या पुलावरुन जीव मुठीत ठेवून करावे लागते मार्गक्रमण

घोडाझरी कुलाबा गेटची नव्याने दुरूस्ती न केल्यास निवडणूकीवर बहिष्कार व आमरण उपोषण करण्याचा सोनापूर गाववासियांचा निर्धार

✒सागर अलोने✒
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
96375 65247

सिंदेवाही: जिर्ण अवस्थेत असलेल्या घोडाझरी नहराच्या कुलाबा गेट कडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष .कुलाबा गेटची नव्याने दुरूस्ती न केल्यास निवडणूकीवर बहिष्कार व आमरण उपोषण करण्याचा सोनापूर गाववासीयाचा निर्धार

नागभीड तालुक्यात येत असलेल्या सोनापुर गावालगत असलेल्या घोडाझरी नहरावरील कुलाबा गेट पुर्णपणे जिर्णाअवस्थेत झाला असून त्याच्या दुरूस्ती कडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सोनापूरचे उपसरपंच महेश फटींग व गावकरी वर्गाच्या वतीने पत्रकार परिषदेत केला आहे .

ब्रिटिश कालीन घोडाझरीचा मुख्य कालव्यावरील कुलाबा गेट क्र ४३ हजार हा पुर्णपणे जिर्णाअवस्थेत असल्यामुळे खचून गेलेला आहे .गावाच्या मधोमध ब्रिटिश सरकारने सोनापूर येथील शेतकऱ्यांना पाण्याची अडचण लक्षात ठेवून गेट ४१हजार ,कुलाबा ३५ हजार ,३८ हजार व ४३ हजारवर पाणीचढवण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आलेली होती .या मध्यभागावरुन गावातील नागरिक नेहमी ये-जाण करीत आहे .तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी व अंगणवाडी विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत मध्ये व गुरुदेव भवन येथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे सोनापुर येथील शालेय विद्यार्थी व नागरिकांना जिर्णाअवस्थेत झालेल्या पुलावरुन जीव मुठीत ठेवून मार्गक्रमण करावे लागते आहे .

सोनापुर ग्रामपंचायत व गावकरी वर्गाच्या वतीने जिर्णअवस्थेत असलेल्या पुलांची दुरूस्ती करण्यात यावी म्हणून कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपूर ,उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग सिंदेवाही,पालकमंत्री विजयभाऊ वड्डेटीवार,आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना सोनापूर गावालगत असलेल्या जिर्णाअवस्थेत झालेला पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आलेली होती .पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या वतीने घटनास्थळावर येवून प्रत्यक्ष पणे मोजणी करण्यात आलेली होती व कामाला मंजूरी मिळेल असे आश्वासन गावकरी वर्गाला दिले होते .मात्र दोन वर्षापासून शालेय विद्यार्थी व गावकरी वर्ग व गुरेढोरे या रस्त्यावरून जिव धोक्यात घालून जात असताना या विभागाचे लोकप्रतिनिधी गावकरी वर्गाच्या मागणी कडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप सोनापुर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गावकरी वर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे आपण वाचलंत का?

 

.पाटबंधारे विभागाच्या वतीने कुलाबा गेट तोडण्याची भाषा नेहमी वापरली जाते मात्र याठिकाणी पाटबंधारे विभागाच्या वतीने १० मार्च पर्यत नवीन पुलीया मंजूर न झाल्यास गावकरी वर्गाच्या वतीने आमरण उपोषण व येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे .यावेळी पत्रकार परिषदेला सरपंच शिला श्रावण ठोंबरे,उपसरपंच महेश धर्मराव फटिंग,ग्राम.सदस्य सविता कुंभरे,ग्राम.सदस्य सिंधू सेलोकर,ग्राम.सदस्य जोत्सना दडमल,ग्राम.सदस्य अमोल पत्रु श्रीरामे,ग्राम.सदस्य भुरु हजारे व गावकरी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .

सोनापूर ग्रामपंचायतच्या वतीने रोजगार हमीयोजनेअंतर्गत तलाव खोली करण्याचा कामासाठी गावातील मजूर जात असताना रोजगार हमीचे काम बाजूला सारुन घोडाझरी नहराच्या जिर्णाअवस्थेत असलेल्या पुलियाबद्दल पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधी वर्गाकडून दुर्लक्ष करीत असल्यामुळे सर्व गावकरी वर्ग एकत्र येवून लढा देण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत करण्यात आला.

या विभागाचे लोकप्रतिनिधी गावकरी वर्गाला साथ न देता शासकीय अधिकारी वर्गाला सहकार्य करीत आहे .सोनापुर गावाच्या मधोमध घोडाझरी गेट पुलिया पुर्णपणे जिर्णाअवस्थेत झाला असून अजून पर्यत त्या कामाला मजूंरी मिळाली नाही .त्या पाटबंधारे विभागाच्या वतीने कुलाबा क्र ४३ हजारला १० मार्च तारखेपर्यत मंजूरी मिळाली नाही तर गावकरी वर्गाच्या वतीने आमरण उषोषण व येणाऱ्या निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे .अशी माहीती महेश धर्मराव फटिंग उपसरपंच सोनापूर यांनी दिली.

https://www.instagram.com/p/CaUi2rgKu8k/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here