पर्यावरण राखण्यासाठी वन्यप्राणी व मानव व प्रशासनामध्ये समतोल राखण्याची गरज 

न्यजीवांचे मोल महत्वाचे असले तरी मानवाचा जीवही अनमोल असल्यामुळे प्रशासनाने समतोल राखण्याची गरज 

पर्यावरण राखण्यासाठी वन्यप्राणी व मानव व प्रशासनामध्ये समतोल राखण्याची गरज

खुशाल सूर्यवंशी
राजुरा तालुखा प्रतिनीधी
8378848427

 

चंद्रपुर– ताडोबा वैभव म्हणून चंद्रपुर जिल्हा जगाच्या नकाशावर पोचला असून हे वैभवस्थान टिकविण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असून वन्यप्राणी जनता व शासकीय यंत्रणा जागरूक असण्याची गरज आहे, असे श्री नितिन भटारकर यांनी मदतीचा हात संस्थेच्या कार्यक्रमात प्रतिपादन केले.

ते पुढे असेही म्हणालेत की वन्यजीवांचे मोल महत्वाचे असले तरी अनमोल मानवाचा जीवही अनमोल असल्यामुळे प्रशासनाने समतोल राखण्याची व अधिक खबरदारी घेण्याची गरज विषद केली.
अहिंसात्मक व फलद्रुप आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मदतीचा हात ह्या संस्थेचे वतीने श्री नितीन भटारकर ह्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ह्याप्रसंगी भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी असंघटित कामगारांना टी शर्ट वितरण करण्यात आले तसेच गरजू मुलीला सायकल वितरण करण्यात आली.

हे आपण वाचलंत का?

व्यसपीठावर मनपा पार्षद श्रीसुभाष कासोनगोट्टूवार विकलांग सेवा अध्यक्ष वर्षा कोठेकर, मुकीपथ फोंडेशनच्या मंजुषा कासून गोट्टूवार ,सामाजिक कार्यकर्त्या शोभा खोडके ,शिवसेना राजुरा उप तालुका प्रमुख खुशाल भाऊ सूर्यवंशी सुनील काळे लक्ष्मण राठोड़ व अन्य मान्यवर ह्यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली यरपुड्डे आबागर प्रदर्शन श्री रवि राठोड ह्यानी केले.

https://www.instagram.com/p/CaHQN0wLyVg/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here