भारतीय जनता पक्ष हा आपल्या सर्वांचा एक परिवार आहे- राजे अम्ब्रीशराव आत्राम

सुंदरनगर येते भाजपा मूलचेरा तालुका कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांना राजेंनी केले मार्गदर्शन

ता.प्रतिनिधी / महेश बुरमवार

मूलचेरा तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकरणीची बैठक आज सुंदरनगर येथे संपन्न झाली, ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणांत बोलतांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष हा आपल्या सर्वांचा एक परिवार आहे तसेच प्रत्येक कार्यकर्ता हा या परिवाराचा एक सदस्य आहे तसेच भारतीय जनता पक्षाने ज्या कल्याणकारी योजना आणल्या त्या शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्यात कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका असावी आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रश्न कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत आणावं मी ते सोडवण्यासाठी तत्पर आहो असे मत त्यांनी यावेळी दिले,पुढे बोलताना ते म्हणाले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होवु शकतात, ह्या निवडणुकीत मूलचेरा तालुक्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आपल्या क्षेत्रात भाजपा कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, जास्तीत जास्त प्रमाणात सोसिएल मीडिया चा वापर करत प्रत्येक माहिती जनतेपर्यंत पोहचवावी असे ह्यावेळी ते म्हणाले,

राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मूलचेरा तालुक्यातील शेकडोच्या संख्येने लोकांनी आज पक्ष प्रवेश केला.

 ह्या बैठकीत मूलचेरा तालुक्यातील भाजपाचे संघटन, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका, धन्यवाद मोदीजी, मन की बात,सोशल मीडिया अशा विविध विषयावर आज मार्गदर्शन करण्यात आले यावेळी श्री.बाबुरावजी कोहळे जेष्ठ नेते तथा प्रदेश सदस्य, प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस एस टी मोर्चा, रेखाताई डोळस महिला आघाडी अध्यक्ष गडचिरोली जिल्हा सचिव बादल शाह, तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता,निखिल हलदार,विजय बिश्वास, संजीव सरकार, बसु मुजुमदार,दिलीप आत्राम, गणेश गारघाटे, किशोर मलिक, अक्षय खिरातकर, गणेश बँकावार,प्रवीण कुमरे, गुलशन मलमपल्ली,वैष्णव ठाकूर मूलचेरा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख,भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here