पंतप्रधान मोदी यांचे नागपूर येथे आगमन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
नागपूर : 28 फेब्रुवारी
यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुधवार, 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.40 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले असून प्रशासनाच्या वतीने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. वायुसेनेच्या हेलिकॅाप्टरने त्यांनी यवतमाळकडे प्रयाण केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ. प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन माटे, मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी नागपूर डॉ. विपिन इटनकर, ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यावेळी उपस्थित होते.