अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

55
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

अर्थसंकल्पीय अधिवेशनात
सरकारविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त असे आहे की राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला आणि सोयाबीनला भाव मिळत नसल्याने सरकारविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले.
राज्यातील जनतेला विकासाचे दिवा स्वप्न दाखवणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारने राज्यातील शेतकरी, मजूर, कामगार, विद्यार्थी, महिला, बेरोजगार यांना वेळोवेळी विकासाच्या नावाखाली गाजर दाखवले आहे.
कापूस, सोयाबीन, धान, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांला फसवणाऱ्या सरकारचा, कांद्याची निर्यातबंदी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.अशा घोषणा करण्यात आल्या.