उमरेड ट्रामा केअर सेंटर ताबडतोब सुरू करण्याबाबत अन्यथा शिवसेना तर्फे आंदोलन करण्यात येईल.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
उमरेड:- उमरेड येथे दि.02/1/2022 ला ट्रामा केअर सेंटर उमरेडचा लोकार्पण सोहळा झालेला असून प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. या ट्रामा केअर सेंटर करिता रक्कम 324.39 लक्ष रुपये शासनामार्फत आलेले आहे. ट्रामा सेंटरचे बांधकाम पूर्ण होऊन इमारत पूर्णपणे सज्ज झालेली आहे. परंतु अजून पर्यंत म्हणजे दोन वर्ष होऊन सुद्धा ट्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. उमरेड चे लोकप्रतिनिधी खासदार व आमदार यांची उदासीन भावना त्यामुळे ड्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. नागरिकांना व गरिबांना छोट्या छोट्या आजारासाठी , ऑपरेशन करिता नागपूर मेडिकल , मेओ ,डागा , एम्स ,या दवाखान्यात हलवले जातात. त्यामुळे गरिबांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. व त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे एक महिन्याच्या आत सरकारी ट्रामा केअर सेंटर सुरू न झाल्यास, बेघर लोकांना राहण्यासाठी लॉक तोडून त्यांची राहण्याची सोय केली जाईल याची दक्षता घ्यावी होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन जिम्मेदार राहील.असे आव्हान देण्यात आले उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांना निवेदन उमरेड ट्रामा केअर सेंटर ताबडतोब सुरू करण्याबाबत अन्यथा शिवसेना तर्फे आंदोलन करण्यात येईल उमरेड शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे आणि उमरेड तालुका शिवसेना पदाधिकारी