भर दिवसा पत्नीची गोळी झाडून हत्या; फरार आरोपींच्या आवळ्या मुसक्या

46
भर दिवसा पत्नीची गोळी झाडून हत्या; फरार आरोपींच्या आवळ्या मुसक्या

भर दिवसा पत्नीची गोळी झाडून हत्या; फरार आरोपींच्या आवळ्या मुसक्या

भर दिवसा पत्नीची गोळी झाडून हत्या; फरार आरोपींच्या आवळ्या मुसक्या

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत :- मंगळवार दिनांक २७ रोजी सकाळी १० च्या सुमारास पत्नीवर गोळी झाडून हत्या झाल्याची घटना समजताच कर्जत तालुका हादरला. धोंडी चंद्रकांत वाघमारे वय-४० वर्षे राहणार नेवाळी असं मृत महिलेचं नाव आहे. तर आरोपी पती चंद्रकांत सखाराम वाघमारे वय ५७ वर्ष हा घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र पोलिसांनी काही तासातचं त्याला ताब्यात घेतले आहे.

मयत धोंडी चंद्रकांत वाघमारे हीचा पती चंद्रकांत हा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याने त्याच्या जाचाला कंटाळून महिन्याभरापासून भावाकडे राहत तिने घटस्फोट घेतला होता. मयत धोंडी हिला आरोपी पती चंद्रकांत पासून कोणतेच अपत्य नसून पहिल्या नवर्यापासून एक मुलगा वय २२ वर्ष सध्या नारंगी येथे वडिलांकडे राहत असून एक विवाहित मुलगी मनीषा वय २६ वर्ष मुक्काम गारमाल, वावोशी तालुका खालापूर येथे राहत आहे. रविवारी रात्री साडे अकरा वाजता गारमाल, वावोशी येथे येऊन तुझ्या आई ला माझ्याकडे यायला सांग नाही तर तिला ठार मारेल अशी धमकी दिली अशी माहिती मयत धोंडी हिच्या मुलीने दिली आहे. त्याचा गावठी दारू चा व्यवसाय असल्याने रात्री अपरात्री दारू च्या कामासाठी तो तिचा वापर करीत असल्याने ती त्याला कंटाळली होती. अशीही माहिती मुलीने बोलताना दिली.
आरोपी चंद्रकांत याची पाहिली पत्नी सुद्धा सोबत राहत होती. त्याच्या पहिल्या पत्नीला दोन मुले असून अलीकडे काही महिन्यापूर्वी पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहिती नुसार दोन पत्नीसह संसार करणारा आरोपी आज एकही पत्नी सोबत नसल्याने नैराश्येत होता.

भर दिवसा पत्नीची गोळी झाडून हत्या; फरार आरोपींच्या आवळ्या मुसक्या

23 फेब्रुवारी रोजी दोघांचा घटस्फोट देखील झाला होता. यामुळे मयत धोंडी चंद्रकांत वाघमारे या महादू रघुनाथ वाघमारे मुक्काम खांडपे येथील भावाकडे राहत होत्या. आरोपी पती चंद्रकांत याने खांडपे कडे भावासोबत दुचाकीवरून येणाऱ्या धोंडी वाघमारे यांना रस्त्यात गाठले व हल्ला केला. यात दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यातच आरोपी चंद्रकांत वाघमारे यानं ठासनीच्या बंदुकीतून पत्त्नीवर गोळी झाडली. यात धोंडी वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ तेथून महादू तेथून निसटल्याने वाचला. यानंतर आरोपी चंद्रकांत वाघमारे घटना स्थळावरून पसार झाला होता.

दरम्यान या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना मिळताच, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास सुरु केला. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीची पोलिसांनी काही तासातचं ताब्यात घेतले.

भर दिवसा पत्नीची गोळी झाडून हत्या; फरार आरोपींच्या आवळ्या मुसक्या

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२/२०२४ कलम ३०२ सह शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड करीत आहेत.