चक्क उल्हासनदी मध्ये दगडी भिंतीचे बांधकाम … स्थानिक ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

53
चक्क उल्हासनदी मध्ये दगडी भिंतीचे बांधकाम ... स्थानिक ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

चक्क उल्हासनदी मध्ये दगडी भिंतीचे बांधकाम … स्थानिक ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

चक्क उल्हासनदी मध्ये दगडी भिंतीचे बांधकाम ... स्थानिक ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत :- कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात दगडी बांधकाम करून भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. जमीन मालकाकडून त्या ठिकाणी मोठे बांधकाम केले जात असून त्या बांधकामाला सरकारी यंत्रणांचा वरदहस्त आहे अशी शंका उपस्थित केली जात आहे. बड्या नेत्यांचा आशीर्वादाने सुरु आहे नदीमध्ये अतिक्रमण अशी चर्चा. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन नदीमध्ये भिंत बांधण्याचे काम थांबले नाही तर ग्रामस्थ उपोषणाला बसतील असा इशारा दिला आहे.दरम्यान,नदीमध्ये बांधकाम करतानाच गेली ५० वर्षे वापरला जाणारा रस्ता देखील तेथून हटवून दुसरीकड़े हलविण्याची शक्यता स्थानिकात बोलली जात आहे.
कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या बाजूने उल्हास नदी वाहते.उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या उल्हास नदी मध्ये अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधले आहेत. त्यामुळे तमनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात उल्हास नदीच्या पात्रात पाणी साठून असते. त्याचा फायदा घेऊन कर्जत मधील शेतकऱ्यांची साडे चार एकर जमीन आकाश चौधरी आणि कमलेश ताठरे या व्यक्तीने खरेदी केली आहे. उल्हासनदी आणि रस्त्याच्या बाजूला अडीच एकर तर रस्त्याच्या पलीकडे दोन अशी साडेचार जमीन असून या जमिनीमधून सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता आहे. मात्र त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे उल्हास नदीमध्ये किमान ३०० मीटर लांबीची दगडी भिंत बांधण्यात येत आहे. हि भिंत सध्याच्या उल्हासनदीच्या पात्रात बांधण्यात येत आहे. त्यात आडिवली पुलाच्या समोर नदी मध्ये भिंत बांधण्यात येत असल्याने पावसाळ्यात नदीच्या पलीकडे राहणाऱ्या गावामध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.उल्हास नदीचे पाणी ज्या भागात येते अगदी त्याच भागात नदीमध्ये भिंत बांधली जात आहे त्यामुळे स्थानिकांच्या मनात आता भीतीचा गोळा आला आहे.
त्यामुळे नेवाळी येथील ग्रामस्थ रवी बेलोसे पांडुरंग बेलोसे भगवान घोडविंदे,अरुण मंडावले,संदीप रुठे,भागाबुवा लोभी,सुनील गायकवाड,प्रदीप ढोले आणि ग्रामस्थ यांनी कर्जतचे तहसीलदार डॉ शीतल रसाळ यांची भेट घेऊन अर्ज दिला. महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उल्हास नदी मध्ये बांधण्यात येत असलेली भिंत दिसत नाही काय? असा संतप्त सवाल ग्रामसरथन्नी केला आहे.मौजे आडिवली व तमनाथ गावाच्या दरम्यान असलेल्या नदीच्या पात्रमध्ये बेकायदेशीररीत्या उल्हास नदीचे ऊत्खणन करून नदीचे पात्रमध्ये बांधकाम सुरू केले आहे.आकाश चौधरी आणि कमलेश ताठरे नावाच्या इसमाने स.नं. हि.नं.२९/२ क्षेत्र ३.०२.00 हया मिळकतीमध्ये व्यवसायिक बांधकाम सुरू केले आहे. सदरचे बाधकाम करीत असताना आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार त्याने महसुल विभागाची तसेच जलसंपदा विभागाची तसेच कुठल्याही सरकारी विभागाची कुठल्याही प्रकारे परवानगी घेतली नाही.ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेमुळे तहसीलदार डॉ रसाळ यांनी उद्याच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.
दुसरीकडे कर्जत-कोंदीवडे हया नदीला लागुन असलेल्या मुख्य रस्त्यापासुन नदीच्या पात्रमध्ये साधारण ५०० फुट आतमध्ये भरावा टाकणेचे काम सुरू केले आहे. सदरचे सुरू असलेले उत्खणन तसेच भराच्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही.जमीन मालक चौधरी यांनी त्याच्या व्यवसायिक बांधकाम करणेसाठी भरावा करून जे नदीचे पात्र बुजवले आहे त्यामुळे आमच्या गावाचे परिसरातुन जाणा-या नदीचे पात्र अर्थात रूंदी कमी झाली आहे. उल्हासनदीला दरवर्दी पुर येत असतो आणि त्यामुळे अनेकदा जनजविन विस्कळीत झाले आहे. आता श्री चौधरी यांनी केलेल्या वेकायदेशीर भरावा व बांधकामामुळे पावसाळयामध्ये खुप मोठा पुर येवु शकतो. आमच्या परिसरात अनेक शेतजमिनी आहेत तसेच राहती घरे आहेत तसेच सदर नदीला लागुन कर्जतला ये-जा करणेसाठी एकमेव दळणवळणाचा मार्ग आहे तो निर्माण होणा-या पुर परिस्थीतीमुळे बाधित होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

बी आर गुंटरवार-उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग,कर्जत
ग्रामपंचायत शिरसे हद्दीतील नदीतील बांधकामाबाबत संबधीत विकासक यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. याबाबत पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.