गोठयात घुसून वाघाने बकऱ्यावर हल्ला केला
सहा बकऱ्या जागीच ठार
त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो 9096817953
भिवापुर :- भिवापूर तालुक्यातील सिल्लेपार येथे आज २८ फरवरी शुक्रवारला पहाटे सकाळी ४ वाजताच्या सुमारास शेतकरी देविदास घरत यांच्या गोठयात घुसून वाघाने बकऱ्यावर हल्ला केला, त्यात सहा बेकऱ्या जागीच ठार केल्या असून एक बकरी गंभीर जखमी असल्याची घटना घडलेली आहे आज माजी आमदार सुधीर पारवे यांनी
यावेळी घटना स्थळी जाऊन वनविभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मध्ये झालेल्या घटनेचा आढावा घेत शेतकऱ्यास योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्याच्या सुचना केल्या.यावेळी वन रक्षक हेमराज काळे, वैभव घरत उपस्थित होते.