कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कार्यरत हवालदार संतोष मंथनवार यांचे दुःखद निधन
✍️लुकेश कुकडकर ✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
9545491059
गडचिरोली : कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कार्यरत हवालदार संतोष मंथनवार (४९) यांचे आज २८ फेब्रुवारी ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
संतोष मंथनवार हे अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवासी होते. आज सकाळी ते गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर होते. साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना गॅरापत्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंथनवार हे पूर्वी आलापल्ली येथे कार्यरत असताना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.