ट्रॅक्टर च्या खाली दबून एकाच मृत्यू तर दोघे जखमी
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
8999904994
गडचिरोली : काल दि. 27 फेब्रुवारी रोजी गोविंदपूर कडून भरधाव वेगाने गिट्टी घेऊन येणारी ट्रॅक्टर डोंगरगाव जवळील वळणावर पलटी झाल्याने एका युवकाचा ट्राली खाली दबून मृत्यू झाला.
सदर घटना दुपारी 3.30 ते 4.00 च्या दरम्याची आहे.गोविंदपूर कडून गिट्टी घेऊन येणारी ट्रॅक्टर डोंगरगाव जवळील वळणार पलटी झाली. गाडी वरचा नियंत्रण सुटल्याने वळणार हा अपघात झाला.गाडी मध्ये बसून येणारे दोन युवक व वाहन चालक ट्रॅक्टर पलटी होताच गाडीतून उडी मारली मात्र एका युवकाचा अंदाज चुकल्याने ट्राली खाली दबून त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या युवकांचे नाव गौरव सुनील जेंगठे वय 16 रा. शिवनी येथील रहिवासी आहे.