Committed for the overall development of Rajura Assembly constituency. - MLA Subhash Dhote.
Committed for the overall development of Rajura Assembly constituency. - MLA Subhash Dhote.

राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्पबद्ध. – आमदार सुभाष धोटे.

राजुरा तालुक्यात २ कोटी १३ लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न.

Committed for the overall development of Rajura Assembly constituency. - MLA Subhash Dhote.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा:- तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण संकल्पबद्ध असून क्षेत्रातील चारही तालुक्यात विकासकामांना गती देण्याचा आपला मानस आहे. क्षेत्रातील गावागावात मुलभूत सुविधा रस्ते, नाल्या, सभागृह, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, कृषी अशा सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करून विकासकामांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोहचवित आहोत. या अंतर्गतच राजुरा तालुक्यात २ कोटी १३ लाख रुपयांची विकासकामांचा शुभारंभ आपण करीत आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या प्रसंगी मौजा चनाखा येथे ग्राम विकास निधीतून अंतर्गत रस्ता व स्थानिक विकास निधीतून समाजभवन बांधकाम करणे किंमत ३०.०० लक्ष, मौजा कोहपरा येथे ग्राम विकास निधीतून अंतर्गत रस्ता व नालीचे बांधकाम करणे – किंमत १०.०० लक्ष, मौजा विहीरगाव येथे ग्राम विकास निधीतून अंतर्गत रस्ता व नालीचे बांधकाम करणे – किंमत २६.०० लक्ष, मौजा सिंधी येथे खनिज विकास निधीतून अंतर्गत रस्ता व स्थानिक विकास निधीतून समाजभवनाचे बांधकाम करणे – किंमत ३०.०० लक्ष, राजुरा – विहीरगाव – धानोरा – अनुर अंतरगाव येथे नाबार्ड निधीतून रस्त्यावरील किमी २८.५०० मधील लहा पुलाचे बांधकाम करणे किंमत ९२.०० लक्ष, मौजा धानोरा येथील हनुमान मंदिर ते नदी घाट पांदण रस्त्यावर पंतप्रधान कल्याण निधी अंतर्गत रपटा बांधक करणे – किंमत २५.०० लक्ष अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी राजुरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, उपसभापती मंगेश गुरुनुले, कृ.उ.बा.स राजुराचे संचालक आबाजी पाटील ढुमने, अविनाश जेनेकर, प स सदस्य तुकाराम माणुसमारे, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदाता जेनेकर, उपसरपंच विकास देवाळकर, सरपंच ॲड रामभाऊ देवईकर, सरपंच रेखा आकनूरवार, उपसरपंच रामभाऊ ढुमने , उपसरपंच निलकंठ खेडेकर, माजी सरपंच वर्षा पिंगे, सरपंच शोभा रायपल्ले, संजय कुडमेथे, उषा टेंभुर्ण सचिव, ग्रा प सदस्य प्रतिभा मडावी, प्रकाश दुर्योधन, सुनीता सातपुते, राजू सातपुते, जोशना वानखेडे, मधुकर धानोरकर, भास्कर मोरे, विनोद ढुमणे, तानाजी मडावी, ज्योषणा दुर्गे सरपंच, घनशाम दोरखंडे उपसरपंच, गौरकार मॅडम, मत्ते, यासह गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here