बल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग च्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लुट थांबवा - मनसेची प्राचार्यांकडे मागणी.
बल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग च्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लुट थांबवा - मनसेची प्राचार्यांकडे मागणी.

बल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग च्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लुट थांबवा – मनसेची प्राचार्यांकडे मागणी.

बल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग च्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लुट थांबवा - मनसेची प्राचार्यांकडे मागणी.
बल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग च्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लुट थांबवा – मनसेची प्राचार्यांकडे मागणी.

सौ हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर :- बल्लारपूर अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात मायनिंग शाखेमधील विद्यार्थ्यांकडून फ्लेम सेफ्टी लॅम्प हांडलींग प्रमाणपत्राच्या नावे हजार रुपये वसूल करण्यात येत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे केली. यावर मनसे कडून आक्षेप घेत नमुना डीजीएमएस च्या साईट वर फ्री मध्ये उपलब्ध असतानाही त्या प्रमाणपत्राच्या च्या नावे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून हजार हजार रुपये वसूल करणे, व त्या बदल्यात कोणतीही पावती न देणे हा सरळ गैरप्रकार आहे असा आरोप करीत मनसेच्या शिष्ठमंडळाने बुधवारी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकीच्या प्राचार्यांची भेट घेऊन हि बाब लक्षात आणून दिली. यावेळी कोविड १९ च्या या महामारीत पालक वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे अशातच जर महाविद्यालय विद्यार्थ्यांची गैरप्रकार आर्थिक लूट करीत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे स्वस्त बसणार नाही व हे शुल्क माफ करा अन्यथा विद्यार्थी वर्गाला परवडेल अशी शुल्क आकारणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आतपर्यंत २०५ विद्यार्थ्यांकडून हे पैसे वसूल करण्यात आले असून उर्वरित ४५० विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेण्यात येणार असल्याचे देखील तक्रार यावेळी विद्यार्थ्यांनी केली. अर्ध्या तासाच्या या परीक्षेसाठी आपण कोणत्या आधारे हे शुल्क आकारात आहेत याचे लेखी उत्तर यावेळी प्राचार्यांना मागण्यात आले, मनविसेच्या शिष्टमंडळाकडून प्रयोग शाळेची पाहणी करून त्याबद्दल अभियांत्रिकी प्राचार्य रजनीकांत मिश्रा व तंत्रनिकेतन प्राचार्य श्रीकांत घोजे यांच्याकडून प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यात आली व त्यांच्याकडून विद्यार्थी व महाविद्यालय व्यवस्थापकाकडून यामध्ये पर्यायी मार्ग शोधून ह्या प्रात्यक्षिकाचे शुल्क कमी करून त्वरित मार्ग काढावा यासाठी आव्हान केल्यानंतर प्राचार्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर निर्णय घेऊ अशी ग्वाही यावेळी दिली. सदर तक्रारीवर दुर्लक्ष केल्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व तंत्रशिक्षण संचालनालय यांच्याकडे तक्रार करून प्राचार्य व व्यवस्थापक मंडळ यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनविसे दिला.

सदर निवेदन ग्रामपंचायत सदस्य तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विवेक धोटे यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात, देण्यात आले यावेळी जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, शहरअध्यक्ष नितीन पेंदाम, शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, तालुकाउपाध्यक्ष मयूर मदनकर, तालुकाउपाध्यक्ष करण नायर अक्षय चौधरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here