ग्राहकांना भुलवणाऱ्या औषधांच्या जाहिरातींवर कारवाई होणार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी लोकसभेत दिली माहिती

ग्राहकांना भुलवणाऱ्या औषधांच्या जाहिरातींवर कारवाई होणार

मीडिया वार्ता न्युज
२८ मार्च, मुंबई: औषधांविषयीच्या जाहिरातींचे नियमन, औषधे आणि जादुई प्रभाव असणारे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954 अंतर्गत केले जात असून राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने नियमन,1945 मध्ये 2015 साली दुरुस्ती करण्यात आली असून, त्यानुसार, एच, एच-1 आणि एक्स या सूचीत समाविष्ट औषधे (म्हणजेच केवळ डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणारी औषधे) यांची जाहिरात करता येत नाही. असे करायचे असल्यास, केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. जर या अटीचे पालन केले नाही, तर अशा उत्पादकांवर कारवाई करण्याचे अधिकार, राज्यातील परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला आहेत.

दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिराती आणि त्यामुळे जनतेच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन, आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारावर,माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 12 जून 2017 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना, ज्या औषधी उत्पादनांसाठी आयुष अथवा राज्यातील औषध परवाना प्राधिकरणाकडून मिळालेला वैध परवाना मिळाला आहे,  केवळ अशाच उत्पादनांची जाहिरात करायला परवानगी देण्यात आली आहे.

इतर लोकप्रिय लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ⬇⬇⬇ 

 

देशातील  औषधांची विक्री आणि वितरण यांचे नियमन करण्याचे अधिकार, राज्य परवाना प्राधिकरणाला असतात, त्यासाठी औषधांची तपासणी करुन, त्यानंतर औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियमन 1945 अंतर्गत त्यांना परवाना दिला जातो. या नियमांनुसार, विक्रीचा परवाना देण्याआधी त्याच्या सर्व अटींबाबतची समाधानकारक पूर्तता व्हायला हवी असते. यात औषधनिर्मितीसाठी पुरेसा परिसर, योग्य त्या साठवणूक व्यवस्था, औषध विक्रीवर देखरेख तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी पात्र आणि सक्षम व्यक्तींची गरज अशा अटींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here