अधिकाऱ्यांच्या संगनमताने सागझाडाची अवैध वृक्षतोड
श्री प्रदीप मनोहर खापर्डे
कान्पा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न. 8329084432
कान्पा – वनपरिक्षेत्र प्रा. स. कार्यालय नागभीड मधील बोथली या गावात श्री अभिमन मोतीराम गजबे राहणार बोथली यांच्या शेतातील नाल्याच्या काठावर असलेले साग झाडाची बिना परवानगीने अवैद्य वृक्षतोड करण्यात आलेली आहे.
नागभीड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून साग झाडाची अवैध वृक्षतोडी कडे वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध वृक्षतोड केली जात असल्याची बाब समोर परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. तसेच ब्रह्मपुरी येथील मुख्य वन संरक्षक ब्रह्मपुरी व सहाय्यक उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी अवैद्य वृक्षतोडीवर व संबंधित दोषीवर कारवाई करावी.