महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटणेव्दारे एक दिवसाचा लाक्षणिक संप

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटणेव्दारे एक दिवसाचा लाक्षणिक संप

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटणेव्दारे एक दिवसाचा लाक्षणिक संप
कृनाल येलगुंडे,✍
हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज.
96579 44844

हिंगणघाट : – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व सामान्य प्रशासन विभागाकडे नागपूर विभागातील अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गामधे पदोन्नतीबाबतचे प्रलंबित फाईल त्वरीत निकाली काढण्याबाबत तसेच शासन निर्णय महसूल व वनविभाग दि. 10 मे 2021 अन्वये नायब तहसिलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून शासनाने घोषित करण्यात आला असून, त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवाजेष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करणेबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. परंतू अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रीया हि अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्य करावे, याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करुनहीं आश्वासन मिळून आश्वासनाची पुर्तता होत नसल्याने, संघटणेने आज दिनांक 28/3/2022 रोजी लाक्षणिक संपाचा निर्णय घेतला आहे.
त्याअनुषंगाने हिंगणघाट उपविभागातील सर्व महसूल कर्मचारी या आजच्या लाक्षणिक संपात सहभागी झाले आहेत. व वरील शासन निर्णय रद्य करणेबाबत शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही, तर दिनांक 4/4/2022 पासून सर्व महसूल कर्मचारी बेमूदत संपावर जाणार आहे.”
आजचे संपाचे यशस्वितेकरीता महेन्द्र फुलझेले, नरेश येतेकर, श्री अजय राऊत, वाय.एन.जगनाडे, संजय उईके, पी.एम.वाघमोडे, राम येवले, श्रीमती संध्या ढवळे, हर्षकुमार डबले, कु. विनीता राठोड, कु. तेजस्विनी चरडे, श्री प्रविण झोड, श्री संतोष चव्हाण, मदन माडे, संजय उइके, गणेश नागमोते तसेच आदी कर्मचारी या संपात सहभागी होते.