सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षे संबंधी १५ दिवसीय अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न

सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षे संबंधी १५ दिवसीय अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 28 मार्च
सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, येथील अर्थशास्त्र विभागाकडून पीएम उषा स्कीम अंतर्गत जी. एस. सी. रूसा याद्वारे तज्ज्ञांचे विचार, ज्ञान आणि माहिती विद्यार्थ्यांना मिळावे,याकरिता “स्पर्धा परीक्षेत अर्थशास्त्र विषयाचे महत्त्व आणि सहभाग” या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम
या विषयावर आयोजन करण्यात आलेले असून उद्घाटन कार्यक्रम बुधवार, 26 मार्च रोजी अब्दुल शफी सभागृहात पार पडला . सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते दीप-प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर , प्रमुख पाहुणे श्रीकांत साव उपस्थित होते. अध्यक्षांच्या हस्ते यांचे विशेष भेटवस्तू, महाविद्यालयाचे वार्षिकांक शब्दगंधा देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरयू पोतनूरवार यांनी केले. स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करीत असतांना मार्गदर्शकांनी आजच्या युगात स्पर्धा परीक्षेचे क्षण क्षणाने वाढत चाललेले महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत साव यांनी स्पर्धा परीक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना माहिती देऊन याबाबतची प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून सांगितली . कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणाद्वारे प्राचार्य.डॉ. पी.एम काटकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत संधी आणि सजगता यावर मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे संचालन कोमल शनैषचंद्र आणि कार्यक्रमाचे आभार वैशाली नंदुरकर यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.