राज्यस्तरीय दुहेरी नृत्य स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाला पुरस्कार
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 28 फेब्रुवारी
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय आयोजित राज्यस्तरीय दुहेरी नृत्य स्पर्धेत येथील सरदार पटेल महाविद्यालयाला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी कौतुक करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.अजय बेले यांच्यासह प्रा. संदेश पाथर्डे, डॉ. सपना वेगिनवार, डॉ. संजय उराडे,डॉ. निलेश चिमुरकर,
डॉ.बिरादर, डॉ.अनिता मत्ते, डॉ.आरती दीखीत,प्रा.अपर्णा तेलंग व प्रा.आशा सोनी यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी या यशाबद्धल विजयी विद्यार्थांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.