गोपनीय माहितीच्या आधारे जुगार अड्यावर धाड टाकून चार आरोपीला घेतल ताब्यात.
त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो 9096817953
भिवापूर.नांद पोलिस
चौकी अंतर्गत येत असलेल्या नांद शिवारात गोपनीय माहितीच्या आधारे जुगार अड्यावर धाड टाकून चार आरोपीला ताब्यात घेतल्याची घटना २६ मार्च बुधवारला सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
नांद शिवारात काही मंडळी तासनतास पत्यांचा जुगार खेळत असतांना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून आरोपी अमोल पाडूरंग गिरडे वय ३८ वर्ष, प्रकाश बापूराव मुंडले (वय ५० वर्षे), स्वप्नील हरिभाऊ चुटे (वय ३० वर्षे)उमेश नथ्युजी दंडारे (वय ३८ वर्षे) हे सर्व नांद येथील रहिवासी असून हे सर्व जुगार खेळतांना आढळून आले असून त्यांच्या ताब्यातून ५२ तास पत्ते, व सात हजार ३०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास भिवापूर पोलिस करीत आहे.