नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. प्रकाश वराडे मनपा सेवेतून निवृत्त
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. प्रकाश वराडे मनपा सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच मनपाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत १६ कर्मचारी सेवेतून शुक्रवारी (ता. 28) निवृत्त झाले. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, रोपटे आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.