बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्ह्या मार्फत कोविड संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले निवेदन.

56

बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्ह्या मार्फत कोविड संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले निवेदन.

बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्ह्या मार्फत कोविड संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले निवेदन.
बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्ह्या मार्फत कोविड संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले निवेदन.

विशाल सुरवाडे ✒
जळगाव जिल्हा प्रतीनिधी
जळगाव:- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस होणारी वाढ,त्यांना पुरविण्यात येणा-या अपुर्ण सुविधा,रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणुक या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व योग्य उपाययोजना करण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टी तर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले.निवेदनातील मागण्यांवर अंमलबजावणी न झाल्यास उग्र आंदोलनाचा ईशारा बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अमजदभाई रंगरेज, जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, शहराध्यक्ष इरफान शेख यांनी दिला.

बहुजन मुक्ती पार्टीच्या मागण्या पुढील प्रमाणे
01) कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे सर्व बिल माफ करावे.
02) जे हॉस्पीटल रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत असेल त्या हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात यावा.
03) प्रशासनाने निश्चित करण्यात आलेला फी संदर्भातील बोर्ड हॉस्पीटलच्या दर्शनी भागावर लावण्यात यावा.
04) जेथे जेथे औषध व इंजेक्शनचा काळाबाजार होत असेल तेथे तात्काळ कारवाई करण्यात यावी व रुग्णांना औषधींचा पुरवठा करण्यात यावा.
05) रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला व असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्याप पावेतो मिळालेले नाही.त्यांना ते तात्काळ देण्यात यावा.
06) गाव खेड्यांमध्ये, शहरांमधील नागरिकांना मोफत धान्य मिळालेले नाही. त्यांना ते तात्काळ वितरित करण्यात यावे.
07) बचत गटातील महिलांना जे कर्ज दिलेले आहे.वर्षभरापासुन कोणत्याही प्रकारचा व्यवसाय न झाल्याने त्यांचे कर्ज माफ करण्यात यावे.

अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमजद भाई रंगरेज, जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, शहराध्यक्ष इरफान शेख, यांनी निवेदन दिले. सुकलाल पेंढारकर, देवानंद निकम, शिवाजी पाटील, विश्वास पाटील, खुशाल शिंदे, मोहन शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते.