मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन.

✒️नीलम खरात, मुंबई प्रतिनिधि✒️
मुंबई,दि.28 एप्रिल:- मुंबईतुन काँग्रेससाठी एक दुखत बातमी आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचं माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्रि एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे आज निधन झालं. गायकवाडानी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. आज सकाळी 10 वाजता गायवकवाड यांचं निधन झालं. एकनाथ गायवाड हे माजी खासदार तसंच मुंबईचे काँग्रेसचे प्रभारी राहिले आहेत. तसंच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी 10 च्या सुमारास कोरोना मुळे दु:खद निधन झालं. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here