जळगाव येथे ऑक्सिजन अभावी झाला महिला रुग्णाचा मृत्यू? डॉक्टरांनी केला हलगर्जीपणा..

50

जळगाव येथे ऑक्सिजन अभावी झाला महिला रुग्णाचा मृत्यू? डॉक्टरांनी केला हलगर्जीपणा..

मृतक महिलेचा परीवाराचा रुग्णांलयावर गंभीर आरोप.

जळगाव येथे ऑक्सिजन अभावी झाला महिला रुग्णाचा मृत्यू? डॉक्टरांनी केला हलगर्जीपणा..
जळगाव येथे ऑक्सिजन अभावी झाला महिला रुग्णाचा मृत्यू? डॉक्टरांनी केला हलगर्जीपणा..

✒विशाल सुरवाडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधि✒
जळगाव,दि.28 एप्रिल:- जळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव येथील मेहरुण परिसरातील सारा रुग्णांलयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये एका महिला रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जी कारभारामुळे माझा आईचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप मृतक महिलेचा मुलाने आणि मुलीने लावला आहे. परंतु, हा आरोप रुग्णालयातील डॉक्टरांनी नाकारला आहे.

जळगाव येथील सारा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये सावदा येथे रहणा-या प्रतिभा कैलाससिंग परदेशी या महिला रुग्णास 16 एप्रिल रोजी रुग्णांलयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची प्रकृती गंभीर नव्हती. पण, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आईचा मृत्यू झाला. हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लवकर लक्षात आला. अन्यथा इतर रुग्णांचेही जीव धोक्यात आले असते, असा आरोप मृत महिलेचा मुलगा व मुलीने केला आहे.