महाराष्ट्रातील हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक सुधारणा व फायर ऑडिट करण्यात यावे: वंचीत मागणी.
अशी हिंगणघाट वंचित बहूजन आघाडी मागणी.
✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.26 एप्रिल:- महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड-19 मुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. अनेक रूग्ण आक्सीजन वीना मृत्यूमुखी पडत आहे. अनेक रूग्णालयाची अवस्था बिकट व गंभीर होत चाली आहे. अनेक रुग्णालयाच्या ठिकाणी स्टॉपची कमतरता आहे. तसेच हॉस्पिटला आग लागण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात बघायला मिळत आहे. काही दिवसा पुर्वी भंडारा येथे आगीमुळे अनेक लहान मुलांना रूग्णाला आपला जिव गमवावा लागला होता. करीता वर्धा जिल्हातील संपूर्ण कोविड हॉस्पिटलची इलेक्ट्रीकचि जुनी फिटीग तपासुन बरोबर करण्यात यावी व फायर ऑडिट करून फायरची व्यवस्था करण्यात यावे अशी मागणी हिंगणघाट वंचित बहूजन आघाडीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत राजेशजी टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलिपभाऊ कहूरके, राजेश खानकूरे, चारू आटे, संतोष सहारे, कूदीक भजभूजे, विरेन्द्र सहारे, केशव सहारे, देवेंद्र त्रिपल्लीवार, महेन्द्र हाडे, मनीष कांबळे उपस्थित होते.