महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चेनची लाखनी पालांदुर मध्ये उडाली किल्ली.
अवैध दारू विक्रेत्यांना मिळाले का? अवैध दारू विक्रीचे परवाने असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
लाँकडाऊन काळात देसी दारू 200, विदेशी दारू 400, मोहची दारू फुल 700 आठवडी बाजारा प्रमाणे अवैध दारू अड्डयाच्या वर गर्दी
✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
भंडारा(लाखणी):– सविस्तर वृत्त असे आहे की तालुक्यामधील गावातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तालुक्यात दोन पोलीस स्टेशन आहेत. एक तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच लाखनी पोलीस स्टेशन तर दुसरे पालांदुर पोलीस स्टेशन सध्या संपूर्ण महाराष्ट्रात करोना च्या संसर्गाने हादरला आहे मुख्यमंत्रीनी संपूर्ण महाराष्ट्र करोना संसर्गाची वाढती रुग्ण संख्या पाहता 5 एप्रिल ला ब्रेक द चेन असा नारा दिला संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 लागू केली. लहान-मोठे व्यवसाय बंद केले काही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या हॉटेलमधून पार्सल, किराणा दुकाने, धान्य दुकाने, औषधी दुकाने, दूध डेरी, बेकरी, भाजी चे दुकाने अशा अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या व सर्व लहान-मोठे व्यवसाय बंद केले महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून महसूल विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग संयुक्त रित्या कोरोना या रोगावर नियंत्रण घालण्याच्या कामात लागल्या परंतु संपूर्ण महाराष्ट्र बंद असताना देखील एक व्यवसाय सुरू आहे. तो म्हणजे अवैध दारू विक्री जणू महाराष्ट्र शासनाने या अवैध दारू विक्रेत्यांना जणूकाही परवाने दिली आहे.
एकीकडे सर्व लहान-मोठे व्यवसाय बंद असल्याने हातावर पोट असलेल्या व्यक्ती वर उपासमारीची वेळ आली आहे. आणि दुसरीकडे अवैध दारू विक्री करणाऱ्या सोन्याचे दिवस आलेले दिसत आहेत महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र बंद केलेला आहे या आदेशाला न जुमानता अवैध दारू विक्रीला महापूर आल्याचे चित्र दिसत आहेत .हा परिसर नेहमी शांत असते मात्र मागील काही महिन्यांपासून अवैध दारू विक्री मध्ये वाढ झाल्यामुळे या शांततामय या परिसराची प्रतिमा मल्लीन होत असून परिसरातील सामान्य नागरिक दहशती च्या वातावरणात जीवन जगत आहे. आज लाँकडाऊनने जीवन जगणे कठीण झाले असतानादेखील दारूच्या आहारी गेलेली व्यक्ती दारू मिळावी या करिता फिरत आहेत .हाताला काम नाही , घरात पैसे नाही, घरात धान्य नाही, घरात किराणा नाही, औषधी साठी पैसा नाही, मात्र दारुसाठी पैशाची जुळवाजुळव करीत असतात. आज परिसरात देशी दारू 200 रुपये ,विदेशी 400 रुपये तर मोहफुल सातशे रुपये अशा भावाने मिळत आहे. अवैध दारू विक्री त्यांच्या अड्ड्यावर सोशल डिस्टन्स सिंगच्या फज्जा उडाला आहे. आठवडी बाजारा प्रमाणे तिथे गर्दी होत असते.ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांप्रमाणे परिसरात अवैध दारु विक्रेत्यांकडून विदेशी दारू होम डिलिव्हरी सुरू आहे. अवैध दारू विक्री त्यांना फोन करून विदेशी दारूची एक बॉटल एक पाणी बॉटल आणि दोन ग्लास बोलावता येते. जणू महाराष्ट्र शासनाने यांना विशेष परवाना दिल्याचे चित्र दिसत आहे. 18 वर्षाखालील मुले सुद्धा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. यामुळे चोरीचे प्रमाण वाढत आहे. हाताला काम नाही पण दारू प्यायची असे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल आता जनतेसमोर उभा राहत आहे.
कोरोना संसर्गाची चेन तोडण्याकरिता ब्रेक द चेन अंतर्गत लाँकडाऊन सुरू आहे. त्या करिता महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग संयुक्त विद्यमाने काम करीत आहेत. या तिन्ही विभागाचे लोक रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. या परिसरातील जनता त्यांचे आभारी आहे पण पोलीस विभाग रस्त्यावरील बिना मास ची माणसे दिसतात .पण अवैध दारू विक्रेता दिसत नाही का ?असा प्रश्न समोर येतो पोलीस विभागालाअवैध दारु विक्रेत्यांचे मुसके आवरण्यात पोलिसांचे पाय मागे का वळतात यात काय गोळ गुपित तर नाही ना? पोलिसांच्या गाडीची माहीती यांना आधीच कशी होते. या अवैध दारु विक्रेत्यांना पोलिस स्टेशन पालांदूर चे विशेष आशीर्वाद तर नाही ना ? असे अनेक प्रश्न समोर येतात या प्रकरणात जिल्हा पोलिस विभागाने लक्ष द्यावे. अशी अपेक्षा परीसरातील जनतेने केली आहे.