कायदेविषयक जनजागृती शिबीर

कायदेविषयक जनजागृती शिबीर

कायदेविषयक जनजागृती शिबीर

✍विठ्ठल ममताबादे ✍
उरण तालुका प्रतिनिधी
मो. नं.9702751098

उरण (रायगड )उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने लहान मुलांविषयीच्या विविध कायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी कायदेविषयक शिबीराचे दि. 27/4/2022 रोजी रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायंन्स अँड कॉमर्स, बोरी -उरण येथे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला दिवाणी न्यायाधीश क. स्तर उरण तथा विधी सेवा समिती उरणचे अध्यक्ष निलेश एम. वाली उपस्थित होते. व त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उरण तालुका वकील संघटना चे अध्यक्ष अँड. डी. व्ही. नवाळे व उपाध्यक्ष अँड किशोर ठाकूर व अँड पराग म्हात्रे , अँड. धीरज डाकी, अँड. जिवीका डाकी, अँड अर्चना माळी उपस्थित होते. शाळेच्या प्रशासकीय अधिकारी पुष्पा कुरूप यांनी प्रस्तावना केली. संस्थेच्या वतीने विकास महाजन , सेक्रेटरी प्रसन्न कुमार , खजिनदार , शाळेच्या प्राचार्य अक्षता घरत व मुख्याध्यापिका संजिता थळी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे उत्तम पार पडला असुन संस्थेचे अध्यक्ष शेखर.व्दा. म्हात्रे यांनी आयोजकांचे, उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here