अन्न प्रक्रिया व अन्न संरक्षण सात दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न स्वयंरोजगार, लघुउद्योग निर्मितीच्या उद्देशाने कार्यशाळा घेतली

अन्न प्रक्रिया व अन्न संरक्षण सात दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न

स्वयंरोजगार, लघुउद्योग निर्मितीच्या उद्देशाने कार्यशाळा घेतली

अन्न प्रक्रिया व अन्न संरक्षण सात दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न स्वयंरोजगार, लघुउद्योग निर्मितीच्या उद्देशाने कार्यशाळा घेतली

✍ मिथुन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8806764515

भंडारा :- भंडारा जिल्हयातील जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या अर्थशास्र विभागाच्या वतीने विद्यार्थीनीं करीता अन्न प्रक्रिया व अन्न संरक्षण सात दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थीनींना स्वयंरोजगार, लघुउद्योग निर्मितीच्या अनुसंघाने ही कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा दिनांक ११ एप्रिल ते २० एप्रिल २०२२ पर्यंत सात दिवसीय कार्यशाळेत शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या विषय तज्ञ सौ. जयश्रीताई धोटे यांनी विविध प्रकारचे उपक्रम राबविले. यात जॅम, जेली, स्वॅश, सॉस, चटणी, लोणचे, सरबते, कृत्रिम सीरप, ज्युस, व शेक आदी पदार्थ निर्मीतीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण या उपक्रमाद्वारे विद्यार्थीनींना दिले. या समारोपीय कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहुन डॉ. कार्तिक पन्नीकर यांनी स्वयंरोजगाराच्या विविध संधीबाबद मार्गदर्शन केले.
हिंदी विभाग प्रमुख डॉ. विनी ढोमणे यांनी स्वयंरोजगारातून स्वावलंबी होण्याचे आवाहण केले. प्रास्ताविक डॉ. व्ही. कन्नाके यांनी केले. संचालन प्रा. प्रतिभा वंजारी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. मनिषा बारापात्रे यांनी केले. कार्यक्रमात तन, मन, धनाने सहकार्य करणारे प्रा.नितीन कळंबे, इंदिरा कंगाले, शारदा फुलवंते व संपूर्ण विद्यार्थीनीं यानी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता भरपूर मेहनत घेऊन कार्यक्रम सफल बनविले. आयोजकांनी यांचे कौतूक करुण आभार मानले. व कार्यक्रम समाप्त केल्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here