महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्याच्या अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिली शपथ
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा २०१५ च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापालिकेच्या मुख्यालयात आज (ता. २८) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ दिली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्याच्या अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला त्वरित व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.
यावेळी उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्री.मनोज तालेवार, परिवहन व्यवस्थापक श्री.विनोद जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक श्री ऋतुराज जाधव, सहाय्यक आयुक्त श्री. हरीश राऊत,सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, सहाय्यक आयुक्त श्री.प्रमोद वानखेडे, सहाय्यक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, सहाय्यक आयुक्त श्री.शाम कापसे, सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनम देशमुख, कार्यालय अधीक्षक श्री राजकुमार मेश्राम, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार व महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री.मनीष सोनी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.