पत्नीने दिला शारिरीक संबंधास नकार, नराधम पतीने केली पत्नीसह आपल्या तीन मुलांची हत्या.

✒️MVN क्राईम रिपोर्टर✒️
उत्तर प्रदेश:- उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने पतीला शारिरीक संबंधास नकार दिल्याने पतीने आपल्या पत्नीची आणि आपल्या तिन मुलाची हत्या केली आहे.
ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बसेडी गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने शारिरीक संबंधास नकार दिल्यानंतर, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. पती एवढ्यावरच थांबला नसून, त्यानंतर त्यांने आपल्या तीन मुलांना नाल्यामध्ये फेकून दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचे नाव पप्पू कुमार असं आहे.
पप्पूने सहा वर्षापूर्वी डॉली नावाच्या मुलीसोबत लग्न झालं होतं. त्याला सोनिया, वंश,आणि हर्षिता अशी तिन मुलं होती. मंगळवारी 25 मे रोजी पप्पू घरी आला आणि त्याने आपली पत्नी डॉलीकडे शारीरिक संबंध ठेवायची मागणी केली. मात्र डॉलीने त्याला नकार दिला. त्यावरून त्यांच्यात खूप वाद झाला. रागात पप्पूने त्याच्याकडे असलेल्या गावठी बंदुकीने डॉलीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर मुलांना नाल्यात फेकले. हे करताना त्याला गावातील काही लोकांनी पाहिलं होतं. गावकरी डॉलीला याची माहिती सांगण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना डॉलीचा मृतदेह आढळला.
गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगितली. त्यांनतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पप्पूला आपल्या ताब्यात घेतल. त्यानंतर पप्पूने आपला गुन्हाही कबुल केला असल्याचं समजतं आहे.