नाराज संभाजीराजे काय भाजपापासून दूर जात आहे? मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मांडणार आपली भूमिका.

41

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.28 मे:- न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा नेते आणि जनता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणावरून राज्यसभेचे छत्रपती खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुपारी संभाजीराजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेणार आहेत. या भेटीनंतर संभाजीराजे आपली भूमिका मांडणार आहेत.

यापुर्वी बीजेपी नेत्यांनी संभाजीराजे यांच्या वर आरोप केल्यामुळे ते सध्या बिजेपी पासून दुर जात असल्याचे राजकिय वर्तुळात चर्चेचा उधाण आले आहे.