स्वस्त धान्य परवाना धारकाने रेशन कार्ड धारक महिलेला केली मारहाण.

54

स्वस्त धान्य परवाना धारकाने रेशन कार्ड धारक महिलेला केली मारहाण.

स्वस्त धान्य परवाना धारकाने रेशन कार्ड धारक महिलेला केली मारहाण.
स्वस्त धान्य परवाना धारकाने रेशन कार्ड धारक महिलेला केली मारहाण.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,कोरोना काळात गरजवंत नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली, मात्र काही स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या नियमाचे उल्लंघन करीत अवेळीं धान्य उपलब्ध करीत आहे. चंद्रपुरात तर एका स्वस्त धान्य दुकानदाराने महिलांना मारहाण केल्याची संतापजनक घटना 27 मे च्या रात्री लोहारा या गावातील घडली आहे.

गावातील स्वस्त धान्य दुकानदार दयाराम बंकुवाले हा रात्री 11 वाजेपर्यंत नागरिकांना धान्याचे वाटप करतात मात्र स्वस्त धान्य दुकानदार दयाराम बंकुवाले यांना दारूचं अतिव्यसन असल्याने 27 मे गुरुवारी रात्री 8.30 वाजता स्वस्त धान्य दुकानात दारूचं सेवन करीत होते. गावातील शुभांगी येसाम्बरे हे धान्य घेण्यासाठी दुकानात गेल्यावर दुकानदार बंकुवाले यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करून शुभांगी येसाम्बरे व त्यांच्या मुलीला मारहाण करण्यास सुरूवात केली. 

इतकेच नव्हे तर दुकानदाराच्या पत्नीने सुद्धा त्या महिलांना मारहाण केली, सदर घडलेला प्रकाराची माहिती शुभांगी येसाम्बरे यांनी रामनगर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी तात्काळ लोहारा येथे पोहचत येसांबरे यांची साक्ष नोंदविली, आरोपी स्वस्त धान्य दुकानदार दयाराम बंकुवाले यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालीत अरेरावी केली. आरोपी बंकुवाले हा लोहारा गावातील माजी सरपंच व एका राजकीय पक्षांचा सदस्य आहे. पीडित महिलांनी बंकुवाले यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. रामनगर पोलिसांनी आरोपी बंकुवाले यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे.