युवक कॉग्रेस चिमूर तर्फे मुलीच्या विवाहासाठी दिला मदतीचा हात.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवानीताई वडेट्टीवार (सरचिटणीस युवक काँग्रेस महाराष्ट्र) यांच्या नेतृत्वात संदीप कावरे यांनी जन सामान्य लोकांना मदत करण्याचा वसा कायम ठेवत चिमूर तालुक्यातील मौजा डोमा येथील श्रीमती यशोदाबाई बावणे यांना त्याच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत केली.
या प्रसंगी मदत सुपुर्द करताना सुरेखाताई सोनटक्के, श्रीकृष्ण जिल्हारे विधानसभा अध्यक्ष सोशल मीडिया कांग्रेस चिमूर विधानसभा, अश्पाक शेख विशाल दिवे, आशिष चौधरी, प्रशांत सोनटक्के व बावणे परिवार उपस्थित होते आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.