काळ नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामात महाघोटाळा शासनाचा महसूल बुडवून गोठे व वाळू विक्रीला

काळ नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामात महाघोटाळा शासनाचा महसूल बुडवून गोठे व वाळू विक्रीला

काळ नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामात महाघोटाळा शासनाचा महसूल बुडवून गोठे व वाळू विक्रीला

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-महाड तालुक्यामध्ये २२ व २३ जुलै 2021 रोजी झालेल्या महापुराने पातळी ओलांडली आणि महाड व बिरवाडी शहरांचे अतोनात नुकसान झाले यामध्ये संपूर्ण बाजारपेठा पाण्यात होत्या त्यानुसार शासनाने उपाययोजना म्हणून काळ व सावित्री नदीपात्रातील गाळ काढण्याचे आदेश देऊन सरकारी यंत्रणा कामाला लावली गेली परंतु पुरेशी यंत्रणा उपलब्ध न झाल्याने कंत्राटी पद्धतीने यंत्रणा लावण्यात आली चार महिने होऊन सुद्धा अद्याप काळ नदीपात्रातील गाळ पूर्ण काढून झालेला नाही एकंदरीत संथ गतीने काम होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला काही दलाल कर्मचाऱ्यांशी संगनमत करून नदीपात्रातील गोटे व वाळू शासनाचा महसूल बुडवून राजरोसपणे विक्री करीत आहेत दलाल एका दगड गोट्यांच्या गाडीमागे दोन ते तीन हजारापर्यंत विक्री करीत आहे तर वाळू माफिया एका वाळूच्या गाडी मागे सहा ते आठ हजार रुपये मिळवीत आहे नदीपात्रातून निघालेला माल किती ब्रास आहे कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे याची दैनंदिन नोंद ठेवणे क्रमप्राप्त असताना सुद्धा कर्मचारी व अधिकारी यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे आज पर्यंत दलालांनी विकलेल्या मालाचा शासनाकडे लेखा जोखाच नाही महसूल भरलेला नसताना नदीपात्रातील वाळू गेली कुठे हे मात्र गुलदस्त्यातच आहे तरी माननीय तहसीलदार साहेब यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे