पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख ” नवी मुंबई रत्न पुरस्कार २०२२” पुरस्काराने सन्मानित

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख ” नवी मुंबई रत्न पुरस्कार २०२२” पुरस्काराने सन्मानित

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख " नवी मुंबई रत्न पुरस्कार २०२२" पुरस्काराने सन्मानित
संतोष आमले
पनवेल तालुका /प्रतिनिधी
9220403509

पनवेल : -क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्यावतीने कोविड काळात महत्त्वपुर्ण काम केल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “नवी मुंबई रत्न पुरस्कार २०२२” ने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.
क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्यावतीने कोविड काळात महत्त्वपुर्ण काम केल्याबद्दल” नवी मुंबई रत्न पुरस्कार २०२२” चे वितरण वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी महापालिकेतील आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी डाॅ.आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त डाॅ.वैभव विधाते, संजय कटेकर ,डॉ. रेहाना मुजावर, डॉ. भक्तराज भोईटे, कोव्हिड हॉस्पिटल मैनेजमेंट व अधिपरिचारिका जेएनएम, आरोग्यसेविका एएनएम, माहिती नोंदणीकार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.