जुना भावे पूल दुर्घटनाग्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाही लक्ष

जुना भावे पूल दुर्घटनाग्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाही लक्ष

जुना भावे पूल दुर्घटनाग्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाही लक्ष

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- महाड-पंढरपूर मार्गावरील जूना भावे पूल हा तेव्हा इंग्रजांच्या वेळेत दगड चुन्याचा वापर करून बांधण्यात आला होता सावित्री पूलाची दुर्घटना झाल्याने शासनाकडून सर्व जुन्या पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आली त्यावेळी पूल कमकुवत झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर २२ व २३ जुलै 2021 रोजी महापूर झाल्याने पूलाची पडझड होऊन नादुरुस्त झाला तो आजतागायत तसाच आहे जून्या पूलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला असून त्याच्यावरुन वाहतूक सुद्धा चालू झालेली आहे तरी सुद्धा काही वाहनचालकांच्या नवीन पूल लक्षात न आल्याने जून्या पूलावरून प्रवास करतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असून पाऊस काही दिवसांवर असताना पुलाला साईट कटाडे नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे नवीन पूल झाल्यामुळे जून्या पूलाची गरज नसल्याने दोन्ही बाजूंनी बंद करण्यात यावा अशा प्रकारची मागणी नागरिकांकडून केली जात आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग महाड दुर्लक्ष करित असून गांभीर्याने घेत नाही याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे