चांदोरे हायस्कूल, नेत्र दिपक कामगिरी. न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे १० वीचा निकाल १००%.

चांदोरे हायस्कूल, नेत्र दिपक कामगिरी.
न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे १० वीचा निकाल १००%.

चांदोरे हायस्कूल, नेत्र दिपक कामगिरी. न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे १० वीचा निकाल १००%.

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगांव :- पन्हाळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे, ता. माणगाव, जि.रायगड या विद्यालयाचा इयत्ता १० वी.चा २०२४ चा निकाल १०० % लागला.
ग्रामीण भागातील या विद्यालयातील यशामागे संस्था चालक संस्थेचे अध्यक्ष बंधुजी घोसाळकर, व संस्थेचे सचिव नाना साहेब सावंत यांचा या यशा माघे सिंहाचा वाटा आहे,त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
विद्यालयाचे मुख्यद्यापक मा. संतोष कासारे सर, सहाय्यक शिक्षक राजेंद्र जंगम सर, इसई मॅडम इत्यादि शिक्षक वृंद, चांदोरे हायस्कूल चे सर्वच शिक्षक अगदी तनमन लावून मुलांना घडविण्यासाठी सतत अतोनात प्रयत्न करीत असतात आज त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त झालेले दिसत आहे.

शिक्षकेत्तर कर्मचारी सुधाकर सावंत , जागृती शिर्के मॅडम, माजी विद्यार्थी मार्गदर्शक भूषण देवरुखकर यांचा सुध्दा या यशा मागे सिंहाचा वाटा आहे. दऱ्या खोऱ्यातून शेतकरी कुठुंबातून अनेक ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेतात.

प्रथम १ ते ५ क्रमांकाचे मानकरी
विद्यार्थी. टक्केवारी
१) कुमार बडबे सुजल चंद्रकांत ९०.४०%
२) कुमारी महादे जान्हवी महेंद्र ८८.००%
३) कुमार आंबेकर कारुण्य सूर्यकांत ८७.८०%
४) कुमारी चाचले रिद्धी राजाराम ८४.८०%
५) कुमारी पालकर सलोनी सुनील ८०.४०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चांदोरे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी खुप खुप कौतुक केले तसेच पुढील वाट चालीसाठी शुभेच्छा दिल्या.