नवीन बसस्थानकासह ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील अतिक्रमण हटविले

नवीन बसस्थानकासह ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील अतिक्रमण हटविले

नवीन बसस्थानकासह ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील अतिक्रमण हटविले

नवीन बसस्थानकासह ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील अतिक्रमण हटविले
🖋️ साहिल सैय्यद…..
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस : मंगळवार, २८ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून शहरात नगर परिषदेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर नगर परिषदेने कारवाई केली. नवीन बसस्थानकासह ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावरील फुटपाथ, नालीवरील अतिक्रमण जेसीबी मशीनद्वारे काढण्यात आले. अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेतर्फे जेसीबी मशीन, क्रेन, ट्रॅक्टर लावण्यात आले होते.

घुग्घुसचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, घुग्घुसचे ठाणेदार श्याम सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे व नगर परिषदेचे कर्मचारी यांनी सकाळ पासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरु केली.

अतिक्रमण काढून नवीन बसस्थानक व ग्रामीण रुग्णालया समोरील रस्ते मोकळे करण्यात आले. फुटपाथवरचे शेड तोडून साहित्य जप्त करण्यात आले.

नगर परिषदेतर्फे सोमवार, २७ मे रोजी सकाळपासून शहरात जाहीर सूचनेद्वारे भोंगा फिरवून अतिक्रमण हटविण्याबाबत सांगण्यात आले होते.

सध्या नवीन बसस्थानक आणि ग्रामीण रुग्णालय उद्घटनाच्या प्रतीक्षेत आहे. नवीन बसस्थानक आणि ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.