एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूरच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश १००% निकाल…..

एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूरच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश १००% निकाल.....

एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूरच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश १००% निकाल…..

एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूरच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश १००% निकाल.....

✍️मृणाली जाधव ✍️
निजामपूर विभाग प्रतिनिधी
📞 70834 51685📞

इंदापूर -(माणगाव)- दहावीच्या परीक्षेत इंदापूर येथील एस एस निकम इंग्लिश स्कूलने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. कुमारी गौरी शैलेश शेठ या विद्यार्थिनीने ९५.२० % गुण संपादन करून शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. या शाळेमधून निधी राजेश महाडिक ९१.४० % द्वितीय, राज अशोक सांगले ९१.२० % गुण संपादन करून तृतीय क्रमांक, रिया विजय सांगले ९०.६० % गुण, अवनी किरण मंचेकर ९०.६० % गुण संपादन करून चतुर्थ क्रमांक, अक्षय राजेश निमूणकर याने ८९.८० % गुण संपादन करून पाचवा क्रमांक पटकावत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.

एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूरच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश १००% निकाल.....

या शाळेमधून यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २२ विद्यार्थी बसले होते त्यापैकी पाच विद्यार्थी ९० % पेक्षा जास्त गुण संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.