जुन्या वादाच्या रागातून टँकर गाडी जाळण्याचा प्रयत्न… इसाने कांबळे येथील घटना,,, आरोपी फरार…
✍️ रामदास चव्हाण✍️
बिरवाडी महाड प्रतिनिधी
📞72767 05457📞
महाड :-कोण कधी आपला राग कशा पद्धतीने व्यक्त करेल हे सांगता येणार नाही. अशीच एक आगळीवेगळी घटना महाड तालुक्यामधील ईसाने कांबळे येथे घडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुका येथील जुन्या रागाच्या वादातून स्वतःच्या मालकीचे घरासमोरील लावून ठेवलेले टाटा कंपनीचे एम एच ०६ जी ८८२९ आणि एम एच ०४ सी जि १६८८ असे दोन टँकर उभे असल्याचे दिसण्यात आले असता आरोपीने रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. गाडी मालक आय्याज अन्वर कारभारी रा. ईसाने कांबळे यांना चाहूल लागल्याने ते प्रत्यक्ष समोर गेले असता आरोपी प्रशांत गोविंद महाडिक राहणार खर्डी यांनी मोटरसायकल घेऊन पळ काढला आहे. घरासमोर असलेल्या टँकर गाडी जाळण्याचा प्रयत्न केला असे आय्याज कारभारी यांनी पोलिसांना सांगितले आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.