महिलेवर अत्त्याचार करून फरार असलेल्या आरोपीस केली अटक
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर मो.
9096817953
भिवापूर :- विवाहित महिलेवर अत्याचार प्रकरणी फरार असलेला मोबाईल व्यवसाईक आनंद पुनमचंद गुप्ता हा नागपूरकडे जात असतांना उमरेड येथे भिवापूर पोलिसांनी २८ मे मंगळवार रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अटक केली. त्यानंतर आरोपीला भिवापूर पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले होते. आज २८ मे बुधवारला दुपारी दीड वाजता आरोपीस नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपी मोबाइल व्यवसाईक आनंद गुप्ता यास नागपूर जिल्हा सत्र न्यायालय येथे न्यायाधीश समोर उभे करण्यात आले. घटनेचे गार्भीय लक्षात घेता मा. न्यायाधीश यांनी आरोपीस १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यातआल्याने आरोपीची रवानगी मध्यवती कारागृहात करण्यात आली आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन करीत आहे.