आज पासून मुंबईत डेल्टा प्लस वायरस बघता नव्याने निर्बंध लागू.

37

आज पासून मुंबईत डेल्टा प्लस वायरस बघता नव्याने निर्बंध लागू.

आज पासून मुंबईत डेल्टा प्लस वायरस बघता नव्याने निर्बंध लागू.
आज पासून मुंबईत डेल्टा प्लस वायरस बघता नव्याने निर्बंध लागू.

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी

मुंबई,दि.28 जून:- मुंबईत कोरोना वायरसच्या पहिल्या आणि दुस-या लाटेच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला होता. आता कोरोना वायरसची ही लाट कमी झाली असली तरी एक नविन संकट समोर दिसायला लागल आहे. कोविड 19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे मुंबईत आणि महाराष्ट्र सर्वीकडे प्रतिबंधात्मक सुरक्षेतेचा उपायोजना करण्यात येत आहे.

कोरोना वायरस महामारिने आधिच संपूर्ण विश्व त्रस्त आहे. त्यात आता कोविड 19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यभरात नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. आजपासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू झाले आहेत. संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधात विस्तार करण्यात आला आहे. त्यात मुंबईचा समावेश लेवल 3मध्ये झाला आहे.

मुंबईमधील कोरोना संसर्गाचा आढावा घेत लेवल 3 च्या नियमांची अंमलबजावणी केली गेली आहे.

मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. सध्या मुंबईचा कोरोना संसर्ग दर 3.96 टक्के असून कोरोना वाढीचा दर 0.09 टक्के आहे. आज पासून लेवल 3 चे नियम लागू होत आहेत.

मुंबईतील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध काय?
अत्यावश्यक दुकाने -दररोज सकाळी 7 ते दुपारी 4
इतर दुकाने- सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 खुली राहातील. ही दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद असतील.
मॉल, थिएटर पूर्णपणे बंद राहतील.
हॉटेल- सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के खुली राहातील. त्यानंतर पार्सल सुविधा देता येईल. हॉटेल शनिवारी व रविवारी बंद राहातील.
रेल्वेसेवा- सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहील.
मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकल चालविण्यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मुभा.
मनोरंजन कार्यक्रम-50 टक्के आसनव्यवस्थेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत.
लग्नसोहळे- 50 टक्के क्षमतेने तर, अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी 20 व्यक्तींना मुभा.
खासगी कार्यालये -50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहातील.
सरकारी कार्यालये-50 टक्के क्षमतेने सुरू राहातील.
आऊटडोअर क्रीडा- पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9.
स्टुडिओत चित्रीकरणास परवानगी.
बांधकाम- दुपारी 4 वाजेपर्यंत मुभा
कृषी- सर्व कामांना मुभा.
ई कॉमर्ससाठी परवानगी.