कोविडमुळे निधन झालेल्या* *अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या* *कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना*

49

*कोविडमुळे निधन झालेल्या*
*अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या* *कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना*

कोविडमुळे निधन झालेल्या* *अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या* *कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना*
कोविडमुळे निधन झालेल्या*
*अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या* *कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना*

*मिडिया वार्ता न्यूज*
*जळगाव जिल्हा प्रतिनिधी*
*विशाल सुरवाडे*

जळगाव – दि. 28 – राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (National Scheduled Castes and Development Corporation) हे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविडमुळे निधन झालेल्या अनुसूचित जातीसाठी Support for Marginalized Individuats for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड -19 या महामारीमुळे ज्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यू पावली आहे, अशा कुटूंबातील प्रमुख वारसदारास एन. एस.एफ.डी. सी, नवी दिल्ली यांचेमार्फत रु. 5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.
वारसदारास एन.एस.एफ.डी.सी मार्फत प्रकल्प किंमतीच्या 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के रक्कम देणार असून असून कर्जासाठी 6 टक्के व्याजदर राहणार असून परतफेडीचा कालावधी 6 वर्षे रहाणार आहेत.
अर्जदार हा अनुसूचित जातीतील असावा. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. (कुटूंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असावे. मृत्यु पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यु पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तीकरीता पुढील पैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत. महानगरपालिका/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यु प्रमाणपत्र/ स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र/ एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र यापैकी एक असावे.
आवश्यक असणारी कागदपत्रे-मयत व्यक्तीचे संपूर्ण नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, मृत्युचा दाखला, रेशनकार्ड, वयाचा पुरावा सोबत जोडणे अनिवार्य आहे.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 15 जून, 2021 पर्यंत मृत्यु झालेल्या अनुसूचित जातीतील कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी, असे के. जी. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.