हिंगणघाट मध्ये ‘अमृत योजनेमुळे खड्डे, धुळ, चिखलाने त्रस्त नागरिकांनी.

✒मुकेश चौधरी विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट,दि.28 जुन:- मोठ्या प्रमाणात गाजावाजा करुन हिंगणघाट शहरात अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे काम सुरु करण्यात आले होते. पण आता अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे काम हे हिंगणघाट शहरातील नागरीकानसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे.
हिंगणघाट येथील नागरिकांनचे सध्या खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे अतोनात हाल होत आहे. त्यासंदर्भात वारमवार नागरिकांनी हिंगणघाट नगर पालिका प्रशासन आणि अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडल्या पण सर्व कुंभकर्नीय झोपेचे सोंग घेतल्याचे दिसत आहे.
हिंगणघाट शहरातील महात्मा फुले वार्ड, काजी वार्ड, शिवाजी वार्ड, भीमनगर वार्ड, विरभगतसिंग वार्ड, हनुमान वार्ड, गौतम वार्ड आदी भागांमध्ये गेल्या दोन ते तिन वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावर जागोजागी खड्डे करण्यात आली होती़ त्यातच भुयारी गटारींची कामे या भागात हाती घेण्यात आली. परिणामी, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही दिवसानंतर या खड्ड्यांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले. त्यामुळे वर्षभरापासून या भागातील नागरिक खड्डे, खराब रस्ते तसेच धुळीमुळे हैराण होते. आता पावसामुळे जागोजागी चिखल झाल्यामुळे समस्यांमध्ये भर पडली आहे. चालणेसुध्दा कठीण झाले असून वाहने घसरून अपघात होत आहे. एवढेच नव्हे तर खड्ड्यांमध्ये पडून रहिवासी जखमी होत आहेत. अमृत योजनेच्या निकृष्ट दर्जाचे काम केले गेल्याची माहिती मिडिया वार्ता न्युज ला या वार्ड मधील नागरीकानी सांगितली. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्याने हिंगणघाट शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहे.
स्थानिक नगरसेवक हे आपल्या कामात व्यक्त आहे. नगर पालिका प्रशासन झोपेत आहे. खराब कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे रहिवाशांनी नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहत आहे. तसेच नगसेवक वॉर्डातील कामे पूर्ण करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप रहिवाशानी केला. त्यानंतर तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करत आहे.
पाऊस झाला की रस्त्यावरून पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे़ अनेक जण खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याच्याही घटना घडत आहेत. धुळ, खड्डे आणि चिखलाच्या समस्यांनी त्रस्त होऊन रहिवाशांनी तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. हिंगणघाट शहरातील माहात्मा फुले वार्ड, शिवाजी वार्ड, गौतम वार्ड, विर भगतसिंग वार्ड, हनुमान वार्ड, काजी वार्ड या क्षेत्रातील विकास कामांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.