*सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने घडिपत्रिका-भित्तीपत्रिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961
नांदेड (जिमाका) दि. 27 :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या घडिपत्रिका-भित्तीपत्रिकाचे प्रकाशन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे जलसंपदा प्रकल्पाच्या आढावा बैठकीत हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर आदि विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रमांची माहिती यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मंत्री महोदयांना दिली. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक श्रीमती अलका पाटील, दुरमूद्रणचालक विवेक डावरे, छायाचित्रकार विजय होकर्णे, सर्वसाधारण सहाय्यक काशिनाथ आरेवार यांनी परिश्रम घेतले.